
बाॅलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही कायमच चर्चेत असते. प्रिती झिंटाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय.

प्रिती झिंटा ही पंजाब किंग्स टीमची मालकीन आहे. नुकताच सोशल मीडियावर प्रिती झिंटाला विचारण्यात आले की, तिने तिच्या पंजाब किंग्स टीमच्या खेळाडूंसाठी कोणता स्पेशल पदार्थ तयार केला का?

यावर उत्तर देत प्रितीं झिंटाने लिहिले की, एकदा साऊथ आफ्रिकेमध्ये असताना मी सर्वांसाठी आलू पराठे बनवले होते. मला जेवण तयार करायला आणि खायला आवडते, असेही तिने म्हटले.

यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स टिमने एकून 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत. प्रितीची टिम आठव्या क्रमांकावर आहे.

प्रिती झिंटा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील अभिनेत्री दिसते.