
अभिनेत्री राणी मुखर्जी हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. काही दिवसांपूर्वीच राणी मुखर्जी हिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे राणी मुखर्जी हिच्या भूमिकेचे काैतुकही करण्यात आले.

आता नुकताच राणी मुखर्जी ही करण जोहर याच्या काॅफी विथ करण शोमध्ये पोहचली. यावेळी राणी मुखर्जी ही काही मोठे खुलासे करताना देखील दिसली.

राणी मुखर्जी हिला विचारण्यात आले की, इतक्या दिवसांपासून तिने मुलगी अदिरा हिला पापाराझी यांच्यापासून कसे दूर ठेवले. कारण अदिरा हिचा एकही फोटो व्हायरल झाला नाहीये.

याबद्दल बोलताना राणी मुखर्जी ही म्हणाली की, मला फार जास्त काही करण्याची गरज पडत नाही. मी फक्त रागाने त्यांना डोळे दाखवले की, ते मला घाबरतात.

पुढे राणी मुखर्जी म्हणाली की, मी खरोखरच पापाराझी यांचे आभार मानते की, त्यांनी माझे नेहमीच ऐकले आहे आणि सपोर्ट केलाय. आता राणी मुखर्जी हिच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.