
नुकताच अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी धक्कादायक खुलासा केला. यासोबत त्यांनी काही मोठे खुलासे देखील केले. एका वर्षापासून काम नाही मिळाले हे देखील रत्ना पाठक शाह यांनी सांगितले.

रत्ना पाठक शाह यांनी काम का नाही मिळाले, याचे कारणही सांगून टाकले आहे. ज्याची आता जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

रत्ना पाठक शाह यांनी म्हटले की, आमच्याकडे सोशल मीडियावरील फॅन फाॅलोइंग पाहून आजकाल काम दिले जाते. मी इंस्टाग्रामवर नसल्याने मला काम मिळाले नसावे.

मी गेल्या एक वर्षांपासून पूर्णपणे बेरोजगार आहे. आता या गोष्टींचा खूप फरक पडतो. आता कुठे जाणार? कुठे जाऊन अभिनय शिकणार. खरोखरच खूप अवघड आहे.

आता रत्ना पाठक शाह यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. रत्ना पाठक शाह यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.