
सामान्य मुलींप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना लहानपणी घृणास्पद कृत्यांचा सामना करावा लागला आहे. अशीच एक अभिनेत्री आहे, जी सुपरस्टारच्या कुटुंबातून येते. त्या अभिनेत्रीवर १३-१४ व्या वर्षी एका अनोळखी व्यक्तीने गलिच्छ कृत्य केलं होतं, ज्याचा तिला आजही विसर पडलेला नाही. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री आणि हा प्रसंग काय आहे.

काही वर्षांपूर्वी सोनम कपूरने एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता. ती २०१६ साली राजीव मसंद यांच्या 'द बॉलिवूड राउंड टेबल' शोमध्ये दिसली होती. त्यावेळी तिच्यासोबत अनुष्का शर्मा, राधिका आपटे, आलिया भट्ट आणि विद्या बालन यांच्यासारख्या व्यक्तीही होत्या. याच दरम्यान सोनमने वयात येताना घडलेल्या घृणास्पद घटनेचा खुलासा केला होता.

सोनम कपूरने सांगितलं होतं की ती १३-१४ वर्षांची असेल. ती एकदा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत रविना टंडन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट पाहण्यासाठी गॅटी गॅलेक्सी थिएटरला गेली होती. तिच्यासोबत अनेक मित्र होते आणि तिच्या मैत्रिणीचा वाढदिवसही होता.

अशा वेळी ते सर्व समोसे घेण्यासाठी दुकानात गेले. सर्व मुली एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या होत्या. तेव्हा मागून एक अनोळखी माणूस आला आणि छेड काढू लागला. सोनम कपूर ती घटना आजही विसरू शकलेली नाही.

सोनम कपूरने सांगितलं होतं, "एक माणूस मागून आला आणि माझी छाती दाबू लागला. त्या वयात माझी छाती तर नव्हतीच. पण त्या कृत्यामुळे मी अचानक थरथर कापायला लागले. मी आतून हादरून गेले होते आणि मला काय करावं ते समजलं नाही. मी फक्त रडायला लागले आणि बराच वेळ रडतच राहिले."