सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने फार कमी वयात दोन मुलींचं मातृत्व स्वीकारलं. अभिनेत्रीची पहिली मुलगी रेने हिने करियरची सुरुवात देखील केली. पण दुसरी मुलगी आद्याप शिक्षण पूर्ण करत आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुकताच दुसरी मुलगी अलिसा हिचा वाढदिवस साजरा केला. अलिसा आता 17 वर्षांची झाली आहे. तिचेच अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अलिसा हिचा जन्म 28 ऑगस्ट 2009 मध्ये झालेला. अलिसा हिला देखील सुष्मिताने दत्तक घेतलं आहे. पण सुष्मिता दोन्ही मुलींवर तिच्या पोटच्या मुलींप्रमाणे प्रेम करते.

अलिसा हिच्या वाढदिवशी अभिनेत्रीने पोस्ट देखील शेअर केली. लहान मुलीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने जुन्या आठवणी ताज्या केल्या. अलिसा हिचं हटके ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.

वाढदिवशी लेकीचे फोटो पोस्ट करत सुष्मिता म्हणाली, 'हॅप्पी बर्थडे शोना... तू एक प्रचंड समजदार, दयाळू आणि उदार मनाची व्यक्ती आहेस...', सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

' 17 वर्षांपूर्वी, याच दिवशी, एका प्रेमळ देवाने तुला मला एक मौल्यवान भेट म्हणून दिलं. म्हणूनच मी तुझं नाव 'अलिसा' ठेवलं, ज्याचा अर्थ 'देवाची मौल्यवान भेट' असा होतो. असं देखील सुष्मिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.