बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप अभिनेता, 18 चित्रपटांपैकी दिला फक्त 1 हिट चित्रपट, वडिल होते मोठे सुपरस्टार
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारचा मुलगा, ज्याने 18 चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं पण मिळालं नाही यश. फक्त 1 चित्रपट दिला हिट.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना त्यांच्या पालकांच्या नावामुळे सुरुवातीला संधी मिळते, मात्र प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याचे करिअर याचेच एक उदाहरण मानले जाते.

एकेकाळी मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूडवर आपला ठसा उमटवला होता. मात्र त्यांचा मुलगा मिमोहला वडिलांप्रमाणे यश मिळवता आले नाही. मिमोहने 2008 मध्ये Jimmy या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण त्यापैकी बहुतेक चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले. मिमोहच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या Haunted 3D या हॉरर-थ्रिलर चित्रपटामुळे मिळाले. सुमारे 13 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 34 कोटी रुपयांची कमाई केली होती.

अलीकडेच त्याने डिजिटल माध्यमात प्रवेश करत खाकी: द बंगाल चॅप्टर या वेब सिरीजमध्ये भूमिका साकारली. तसेच 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटामुळेही त्याच्या कामाची काही प्रमाणात दखल घेतली गेली.

सुमारे 18 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत मिमोह चक्रवर्तीने 18 हून अधिक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले असले, तरी स्टारकिड असूनही त्याला बॉलिवूडमध्ये वडिलांइतके मोठे यश आणि लोकप्रियता मिळवता आलेली नाही.