
अभिनेता अजय देवगणचा नुकताच कॉमेडी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2' थिएटरमध्ये रिलीज झाला. आता अशी बातमी आहे की, अभिनेता साऊथ इंडस्ट्रीतील डायरेक्टरसोबत हातमिळवणी करु शकतो.

अजय देवगणची साऊथच्या इंडस्ट्रीवर नजर आहे. तिथल्या अनेक चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक केलाय. अजय देवगण कन्नड़ डायरेक्टर जेपी थुमिनाडसोबत पुढचा चित्रपट करु शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार अजय देवगणची डायरेक्टर जेपी थुमिनाडसोबत एका हिंदी चित्रपटाबाबत बोलणी सुरु आहेत. ही फिल्म KVN प्रोडक्शन बनवणार आहे. सध्या प्रोडक्शन हाऊस 'हैवान' आणि यशची 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' सारख्या चित्रपटांची निर्मिती करत आहे.

अशी बातमी आहे की, अजय देवगणला मॅथरी मूवी मेकर्स (ज्यांनी 'पुष्पा' फ्रेंचाइजी प्रोड्यूस केली) आणि सन पिक्चर्स (ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले, त्यात नुकताच रिलीज झालेला कुली सुद्घा आहे) यांनी सुद्धा अप्रोच केलय.

एक सोर्सच म्हणणं आहे की, जिथे मॅथरी आणि सन पिक्चर्ससोबत बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत. तेच KVN प्रोडक्शन्ससोबत चर्चा पूर्ण झाली आहे. डायरेक्टर जेपी थुमिनाड यांनी अलीकडेच कन्नड़ हिट फिल्म Su From So ला डायरेक्ट केलं होतं.