PHOTO : बुडालेल्या बोटीचे फोटो, चिखलाने भरलेलं गाव, कसं आहे ब्रह्मनाळ?

ज्या ठिकाणी कालची ब्रम्हनाळ बोट दुर्घटना घडली त्या घटनास्थळी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी राहुल झोरी पोहोचले.

Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 09, 2019 | 3:19 PM
1 / 7
सांगली : पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ या पुराने वेढलेल्या गावात बोट उलटून जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी 8 ऑगस्टला ही दुर्घटना घडली. त्यानंतर आज टीव्ही 9 मराठीची टीम घटनास्थळी दाखल झाली.

सांगली : पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ या पुराने वेढलेल्या गावात बोट उलटून जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी 8 ऑगस्टला ही दुर्घटना घडली. त्यानंतर आज टीव्ही 9 मराठीची टीम घटनास्थळी दाखल झाली.

2 / 7

हीच ती दुर्घटनाग्रस्त बोट आहे, ज्यातून 30 प्रवासी निघाले होते. याच बोटीला अपघात झाला आणि अनेकांचा जीव गेला

3 / 7

पोटच्या पोरासारखं सांभाळलेलं हे पशूधन जेव्हा डोळ्यादेखत वाहून जात होतं, तेव्हा शेतकरी तीळ तीळ तुटत होता. जी जनावरं वाचली आहेत, त्यांचं पालन पोषण करताना शेतकरी जीवाचं रान करत आहेत. ब्रह्मनाळमधील गल्यांमध्ये जनावरं दिसत आहेत.

4 / 7

काही गावांमध्ये जनावरं घराच्या छतावर/टेरेसवर बांधली आहेत.

5 / 7

पुराने वेढलेल्या गावातून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मनाळ गावात अक्षरश: रांग लागली आहे. खाण्या-पिण्याची काहीही व्यवस्था नाही, सरकारी मदत नाही, पिण्याचं पाणी नाही, त्यामुळे या गावातील नागरिक आसऱ्यासाठी सुरक्षित जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

6 / 7

सरकारनं केलेले सर्व दावे कसे उघडे पडलेत याचं जळजळीत वास्तव गावकऱ्यांनी मांडलं. गेल्या 4 दिवसांपासून हे लोक पाण्याने वेढली गेली आहेत. यांच्यापर्यंत इतर मदत तर सोडाच पण पिण्याचं पाणीही पोहोचलं नसल्याचं गावकरी सांगतात.

7 / 7

ब्रम्हनाळ गावात जाण्यासाठी अतिशय चिंचोळा रस्ता आहे. या रस्त्यानं दोन माणसांना देखील चालता येणार नाही, एवढी छोटी वाट आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us