AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंनी दिला दणका

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरु आहे.

Tukaram Mundhe : नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंनी दिला दणका
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 13, 2026 | 8:01 AM
Share

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत. तुकराम मुंढे यांच्या FDA ने मोठ्या फूड जॉइंटवर कारवाई केली आहे. थेट डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटवर धाड टाकली आहे. व्हेज-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म वापरला जात होता. डॉमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यात तीन मुंबईतील आहेत. डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटवर धाड टाकल्यानंतर तिथे तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं. ही कारवाई राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरु असलेल्या कारवाईचा भाग आहे.

विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याशिवाय मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज आउटलेटसचे परवाने निलंबित करण्यात आलेत. ज्यूबिलंट फूडवर्क्स अंतर्गत हे आउटलेट्स सुरु होते.

त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला

विलेपार्ले पश्चिमेला असलेल्या डॉमिनोज आउटलेटमध्ये FDA अधिकाऱ्यांना अनेक कमतरता आढळून आल्या. FSSAI परवाना नीट प्रदर्शित होत नव्हता, पिण्याच्या पाण्याची खराब व्यवस्था, अन्न स्टोरेज व्यवस्था, पेस्ट कंट्रोल एकूणच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला. फ्रोझन अन्न पदार्थांच्या तापमानावर लक्ष द्या, खाद्यपदार्थांच वर्गीकरण, पेस्ट कंट्रोल, स्वच्छता व्यवस्था याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा