मद्यपींसाठी खुशखबर! जगातले सर्वात प्रसिद्ध ब्रँड आता भारतात; लवकरच…

भारतात मद्यपींची कमतरता नाही. लाखो लोक भारतात रोज मद्यप्राशन करतात. त्यामुळेच भारत ही मद्यविक्री व्यवसायासाठी मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळेच अनेक दिग्गज मद्यनिर्मिती कंपन्या भारतात उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

| Updated on: Mar 05, 2026 | 10:54 PM
1 / 5

2 / 5

असे असतानाच आता भारतातील मद्यपींना आगामी काळात महागडे आणि ब्रँडेड मद्य प्यायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेतील Brown-Forman ही प्रसिद्ध मद्यनिर्मिती कंपनी Jack Daniel’s या व्हिस्कीची निर्मिती कतरते. हीच कंपनी आता भारतात आणखी काही ब्रँडेड मद्यांच्या विक्री वाढावी यासाठी प्रयत्न करत आहे.

3 / 5

या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी दोन ते तीन वर्षात भारतात अनेक नवे आणि प्रमीयम ब्रँड्स लॉन्च केले जाणार आहेत. El Jimador आणि Herradura यासारखे टकिला ब्रँड तसेच Benriach ही व्हिस्कीदेखील लवकरच भारतात येऊ शकते.

4 / 5

भारतात आता प्रीमियम मद्यांची मागणी वाढत आहे. जास्त लोक महागड्या मद्यांचे सेवन करत आहेत. मद्याच्या बाजारावर लक्ष टेवणाऱ्या IWSR या संस्थेनुसार 2032 सालापर्यंत भारत हा सर्वात मोठा मद्यबाजार म्हणून ओळखला जाऊ शकतो. प्रत्येक वर्षी 1.2 ते 2 कोटी नवे ग्राहक जोडले जातात.

5 / 5

(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशनाची सवय लागल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्यावी.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us