माझा विश्वासघात झाला; पृथ्वी शॉ आणि आकृतीचे नाते तुटले? साखरपुड्याच्या 4 महिन्यांतच…

पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी आकृती अग्रवाल यांच्या चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. पण आता त्यांचे नाते तुटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आकृतीने तिच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

| Updated on: Jul 05, 2026 | 3:15 PM
1 / 5
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी आकृती अग्रवाल हे कायमच चर्चेत राहिले आहेत. आता त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर मोठा दावा करण्यात येत आहे. मार्च २०२६ मध्ये दोघांनी साखरपुडा केल्यानंतर आता मोठी खळबळजनक माहिती समोर येत आहे. आकृती अग्रवालने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट्स शेअर केली आहे आणि तिने उचललेल्या पावलांमुळे या नात्याच्या संपण्याच्या अफवांना बळ मिळाले आहे.

2 / 5
आकृती आणि पृथ्वी शॉ यांचे नाते तुटले असल्याच्या अफवांना सर्वात मोठा आधार मिळाला आहे. आकृती अग्रवालने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून पृथ्वी शॉसोबतचे सर्व फोटोज काढून टाकले आहेत. एवढेच नाही तर मार्चमध्ये झालेल्या साखरपुड्याचे सुंदर फोटोजही प्रोफाइलवरून पूर्णपणे डिलीट केले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नाते संपल्याचे संकेत देत आकृतीने पृथ्वी शॉला अनफॉलोही केले आहे. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

3 / 5
सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यात आकृती अग्रवालने काही तासांनंतर ती स्टोरी डिलीट केल्याचेही सांगितले जाते. व्हायरल स्टोरीत लिहिले आहे की, “माझा अनेकदा विश्वासघात झाला, तरी मी एक शब्दही बोलले नाही. अजूनही विश्वास बसत नाही की, जीवनात एक पाऊल पुढे टाकल्यानंतरही…” दुसऱ्या एका फोटोसोबत तिने लिहिले, “तो नेहमी खोटे बोलत राहील.” मात्र, या संपूर्ण वादावर अद्याप दोघांकडूनही कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

4 / 5
आकृती अग्रवाल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री आहे. ती इन्स्टाग्रामवर सक्रिय असते, तिचे सुमारे ३१ लाख फॉलोअर्स आहेत. तसेच तिने तेलुगू चित्रपट ‘त्रिमुखा’मधून चित्रपटसृष्टीत डेब्यू केला आहे. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे, ज्यावर हजारो सबस्क्रायबर्स आहेत.

5 / 5
पृथ्वी आणि आकृती हे अनेकदा एकत्र फिरताना दिसले होते. साखरपुड्यापूर्वी दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. सध्या या जोडीच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, दोघांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us