मुस्लीम महिलांसाठी आता मॅग्नेटिक हिजाब, नव्या शोधाची होतेय चर्चा; विशेषता काय?

हा हिजाब तयार करण्यसाठी एकूण तीन वर्षांचा कालावधी लागला. गेल्या तीन वर्षांपासून अशा प्रकारच्या हिजाबसाठी संशोधन सुरू होते. या हिजाबचा मुस्लीम महिलांना खूप फायदा होणार आहे.

| Updated on: Dec 13, 2025 | 9:42 PM
1 / 5
मुस्लीम धर्मात हिजाबला फार महत्त्व आहे. ब्रिटनमध्ये अनेक मुस्लीम महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यामुळे अशा मुस्लीम पोलीस कर्मचाऱ्यांना हिजाब परिधान करून नोकरी करणे अडचणीचे ठरते. हीच बाब लक्षात घेऊन ब्रिटन प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
मुस्लीम महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ब्रिटनमध्ये एक खास हिजाब तयार करण्यात आला आहे. या हिजाबमध्ये लोहचुंबक आहे. सामान्या हिजाबच्या तुलनेत हा हिजाब काहीसा वेगळा आहे. एका साधारण कापडाप्रमाणेच या कापडलालाही डोक्यावर परिधान करता येणार आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
नोकरीवर असताना मुस्लीम महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे यासाठी या काश हिजाबची निर्मिती करण्यात आली आहे. लोहचुंबक असलेल्या या मॅग्नेटिक हिजाबमध्ये क्विक रिलीज मॅग्नेटिक सिस्टीम आहे. अशा प्रकारचा हिजाब तयार करण्यासाठी एकू तीन वर्षांचा कालावधी लागला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
मॅग्नेटिक अटॅचमेंट असल्यामुळे आणीबाणीच्या काळात पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून हा हिजाब कोणत्याही अडथळ्याविना निघू शकणार आहे. कठीण प्रसंगी हा हिजाब लगेच काढता यावा आणि परिधान करता येतो. मुस्लीम धर्मीय महिलांनी जास्तीत जास्त संख्येने पोलिसात नोकरी करावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
या हिजाबमुळे नोकरीवर पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळला जाणार नाही. अगोदर हिजाब परिधान करून नोकरी करणे थोडे जिकरीचे वाटायचे. मात्र आता या हिजाबमुळे मुस्लीम महिला कर्मचाऱ्यांना हिजाब घालून आरामात नोकरी करता येणार आहे. अशा प्रकारचा हिजाब वापरणे इतर सामान्य हिजाबपेक्षा सोइस्कर असल्याचे सांगितले जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)