
लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाला अनोखे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर 5G स्मार्टफोन देऊ शकतो. तुम्ही बजेटची चिंता करत असाल तर अगदी कमी किंमतीत सुद्धा चांगले मोबाईल मिळू शकतात.

बेस्ट 5G Mobile कमी किंमतीत गिफ्ट करु शकता. 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये हे शानदार स्मार्टफोन रक्षाबंधनाला चार चांद लावतील.

Poco M6 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणाऱ्या या 5G फोनचा 6GB/128GB व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन तुम्ही Flipkart वरुन खरेदी करु शकता.

Lava Yuva 5G Price : 4GB+4GB (व्हर्च्यअल रॅम) आणि 50MP रिअर कॅमरा असलेला हा बजेट फोन ग्राहकांना 9349 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा डिव्हाईस ग्राहकांना Amazon वरुन खरेदी करता येईल.

itel Color Pro 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमरा आणि 6GB+6GB च्या (व्हर्च्यअल रॅम) या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. हा हँडसेट तुम्ही Amazon वरुन खरेदी करू शकता.

Nokia G42 5G Price : या स्मार्टफोनमध्ये 2 वर्षांपर्यत अँड्रॉईड अपडेट्स, 4GB+2GB (व्हर्च्युअल रॅम सपोर्ट) आणि 50MP रिअर कॅमेरा सपोर्ट मिळेल. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. हा फोन ग्राहक Amazon वरुन खरेदी करु शकतील.