Nagpur Pola : नाद खुळा! तब्बल आठ फुटांचा लाकडी बैल, खर्च असा केला की आली असती नवी कोरी कार, आकडा वाचून चकीत व्हाल

तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या लकडगंज बाजारात तब्बल आठ लाख रुपये किमतीचा भव्य लाकडी नंदीबैल विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील कारागीर रवींद्र मोकद्दाम यांनी सागवानाच्या लाकडापासून हा नंदीबैल तयार केला आहे

| Updated on: Sep 10, 2026 | 8:18 PM
1 / 5
नागपूरात कारच्या किंमतीचा तब्बल आठ लाख रुपयांचा लाकडी बैल पाहायला मिळाला आहे. तान्हा पोळ्यासाठी विदर्भातील सर्वात मोठा लाकडी नंदी नागपूरच्या बाजारात विक्रीला आला आहे.

नागपूरात कारच्या किंमतीचा तब्बल आठ लाख रुपयांचा लाकडी बैल पाहायला मिळाला आहे. तान्हा पोळ्यासाठी विदर्भातील सर्वात मोठा लाकडी नंदी नागपूरच्या बाजारात विक्रीला आला आहे.

2 / 5

नागपूरच्या बाजारात 7.5 फूट उंच, 8 लाख रुपये किमतीचा लाकडी नंदी विक्रीला उपलब्ध, यंदाच्या पोळ्याच्या पाडव्यातील सर्वात ट्रेंडिंग नंदी. वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील कारागीर रवींद्र मोकद्दाम यांनी हा लाकडी बैल तयार केला आहे.

3 / 5

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्याच्या परंपरेची सुरुवात नागपूरच्या श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले द्वितीय यांनी १७८९ मध्ये केली. लहान मुलांना बैलांचे आणि शेतीचे महत्त्व समजावे, या उद्देशाने लाकडी बैलांचा तान्हा पोळा सुरू करण्यात आला.

4 / 5

विदर्भाच्या ग्रामीण संस्कृतीची ओळख असलेला तान्हा पोळा हा केवळ उत्सव नसून बैल आणि शेतकरी यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक आहे. आजही ही परंपरा मोठ्या उत्साहात जपली जात आहे. यंदा नागपूरच्या लकडगंज बाजारात वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील कारागिराने तयार केलेला भव्य नंदीबैल विशेष आकर्षण ठरला आहे.

5 / 5

सागवानाच्या लाकडापासून तयार केलेला हा बैल सुमारे आठ फूट उंच आणि आठ फूट लांब असून, त्यावर अत्यंत आकर्षक कोरीवकाम करण्यात आले आहे. या भव्य लाकडी नंदीबैलाची किंमत तब्बल आठ लाख रुपये आहे.हा बैल म्हणजे केवळ आकर्षक कलाकृती नसून, विदर्भाच्या ग्रामीण संस्कृतीचा, शेतकरी जीवनाचा आणि बैलांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा जिवंत वारसा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us