थेट खरेदी करा दुबईत हक्काचे घर, दुबईत घर खरेदी करणे झाले सोपे, नवीन योजनेचा घ्या लाभ..
दुबईमध्ये घर खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता ते स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण दुबई सरकारने दुबईत घर खरेदी करण्याकरिता खास नवीन योजना आणली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही दुबईत अगदी सहजपणे घर खरेदी करू शकता.

जगातील अनेक व्यक्तींचे दुबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न आहे. मोठे बिझनेसमॅन, कलाकार यांचे दुबईत घर देखील आहेत. जर तुमचेही दुबईत घर घेण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण होऊ शकते.

दुबईत घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होईल, एक खास योजना सुरू झालीये. Emirates 24x7 च्या रिपोर्टनुसार, दुबई लॅंड डिपॉर्टमेंट आणि अर्थव्यवस्था आणि पर्यटन विभाग यांनी Fitst time home buyer programme 2026 सुरू केला.

यातून युएईच्या लोकांना घर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन केले जातंय. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 3200 पेक्षा अधिक लोकांनी दुबईमध्ये आपले घर खरेदी केले.

या योजनेच्या माध्यमातून अनेक सुविधा देण्यात आल्यात. ज्यात तुम्ही अगदी सहजपणे घर खरेदी करू शकता. या योजनेत दुबईतील 22 मोठे रिय एस्टेट डेव्हलपर्स सहभागी आहेत.

अनेक प्रमुख बॅंकांमधून तुम्हाला घराकरिता लोन देखील मिळेल. या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्यात. याकरिता आपल्याला Dubai REST App वर सर्व माहिती मिळेल.