Heart Attack: दारु पिण्यामुळे हार्ट अटॅक येतो? कोणत्या पदार्थांमुळे वाढते शक्यता जाणून घ्या..

Heart Attack: हार्ट अटॅक हा अचानक येत नाही. कधीकधी आपण काय खातो यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. दारु पिण्यामुळे हार्ट अटॅक येतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया त्याविषयी...

Updated on: Nov 13, 2025 | 3:33 PM
1 / 7
आजकाल हार्टअटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांना वाटतं की हार्ट अटॅक हा अचानक येतो. पण तसे अजिबात नाही. खरंतर अनेक गोष्टी हृदयाला रोज नुकसान पोहोचवत राहतात. शरीर याचे संकेतही देतं, पण ते इतके सामान्य असतात की लक्ष जात नाही. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की दारु पिण्यामुळे तर हार्ट अटॅक येत नाही. चला जाणून घेऊया हार्ट अटॅकची लक्षणे आणि कारणे जाणून घेऊया...

2 / 7
बऱ्यादचा महिनाभर आधी हार्ट अटॅकची लक्षणे दिसतात. एका आयुवेर्दिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चक्कर येणं किंवा अंधारं दिसणं, पायात सूज येणं, नेहमी थकवा जाणवणं, श्वास फुलणं आणि छातीत जडपणा राहणं हे लक्षणे वारंवार दिसत असतील तर हार्ट अटॅकची लक्षणे असतात. त्यामुळे त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे. असं तेव्हा होतं जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही किंवा अशकतापणामुळे ते इतर अवयवांपर्यंत पोहोचवू शकत नाही. कधीकधी काही पदार्थ हे हार्ट अटॅक येण्यास कारणीभूत ठरतात.

3 / 7
गुलाबजाम, बर्फी, आइस्क्रीममध्ये साखर मोठ्या प्रमाणावर असते. त्यात वरून चहा-कॉफीतही साखर टाकली जाते. इतकी साखर शरीराला अतिशय आजारी करू शकते. यामुळे टाइप २ मधुमेह आणि हायपरटेन्शन होऊ शकतं. ज्याला हृदयरोग आणि हार्ट अटॅकचे मुख्य कारण मानलं जातं. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करा.

4 / 7
भारतात ९९ टक्के लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खातात.जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका व्यक्तीला दिवसाला ५ ग्रॅम मीठ (२ ग्रॅम सोडियम) पेक्षा जास्त खाऊ नये. पण लोक यापेक्षा दुप्पट खातात, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. मग यातून हार्ट अटॅक, पोटाचा कर्करोग, लठ्ठपणा, हाडांचा ऱ्हास (ऑस्टियोपोरोसिस) आणि किडनीचे नुकसान होतं.

5 / 7
बाजारात मिळणारे बहुतेक खाद्यपदार्थांत पाम तेलात तळलेले असतात. त्यातील हायड्रोजनेटेड करून स्वस्त आणि जास्त काळ टिकणारं बनवलं जातं. एनसीबीआयच्या २००९ च्या अभ्यासात यात ट्रान्स फॅट भरपूर असल्याचे सांगितले आहे. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे बाहेरील तळलेले पदार्ख खाणे टाळा.

6 / 7
हार्ट अटॅकची चर्चा असेल आणि दारूचा उल्लेख नसेल असे होऊ शकत नाही. दररोरज दारु पिणे शरीरासाठी घातक असते. अल्कोहोलची व्यसन हृदयासाठी अतिशय धोकादायक आहे. जास्त प्रमाणावर दारु प्यायल्यामुळे हाय बीपी, लठ्ठपणा, हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. कधीकधी अचानक येणारा हार्ट अटॅकला दररोरची दारु देखील कारणीभूत ठरु शकते.

7 / 7
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्लाशिवाय उपाचार घेऊ नये)