Kartik Aaryan Film : ‘कॅप्टन इंडिया’ बद्दल मोठी अपडेट.. कार्तिक आर्यनने काय सांगितलं ?

अभिनेता कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षित 'कॅप्टन इंडिया'च्या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. शिमीत अमीन दिग्दर्शित या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पहात आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 7:31 PM
1 / 5
अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपट   ‘कॅप्टन इंडिया’ चं शूटिंग सुरू झालं आहे. शिमीत अमीनच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या   ‘कॅप्टन इंडिया’साठी कार्तिक आर्यन लंडनमध्ये दाखल झालाय. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

2 / 5

या फोटोंमध्ये ‘कॅप्टन इंडिया’शी निगडीत काही इंटरेस्टिंग फोटोही दिसले. एका फोटोत कार्तिकच्या हातात फिल्मच्या शूटिंगचा ड्राफ्ट दिसला. त्याच्या कव्हरवर दिग्दर्शक शिमित अमीनचं नावही होतं.

3 / 5

या चित्रपटात कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे, मात्र इतर कलाकारांबद्दल फारशी माहिती अजून समोर आली आहे. भूषण कुमार यांची टी-सीरिज आणि बावेजा स्टुडिओ मिळून ‘कॅप्टन इंडिया’ चित्रपट बनवणार आहेत. हा चित्रपट पुढल्या वर्षी , 13 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

4 / 5

दरम्यान, कबीर खानच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचं शूटिंग करताना कार्तिक आर्यनला नुकतीच दुखापत झाली होती. त्याच्या पायाला बरंच लागलं होतं, मात्र आता त्याची दुखापत बरी झाली आहे.

5 / 5

यापूर्वी कार्तिक आर्यन हा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात अनन्या पांडेसोबत झळकला होता. पण बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने फार गल्ला कमवला नाही. आता कार्तिक लवकरच 'नागजिला'मध्ये दिसणार असून त्याचा फर्स्ट लूकही समोर आलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us