कोणाचं ब्रेकअप, तर कोणाचं मोडलं लग्न..; 2025 मध्ये ‘या’ जोडप्यांच्या नात्यात पडली फूट

2025 या वर्षात एकीकडे अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली, तर काहींचं ब्रेकअपसुद्धा झालं. यात अशीही एक जोडी आहे, जी लग्नापर्यंत पोहोचली होती, परंतु त्यांची लव्ह-स्टोरी त्याआधीच संपली.

| Updated on: Dec 25, 2025 | 11:00 AM
1 / 7
2025 मधील सर्वांत चकीत करणारं ब्रेकअप म्हणजे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांचं वर्षाच्या सुरुवातीलाच ब्रेकअप झालं. यामागचं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही. दोघांनीही माध्यमांसमोर त्यावर बोलणं टाळलं.

2 / 7
प्रियांका चाहर चौधरी आणि अंकिता गुप्ता ही प्रेक्षकांची आवडती जोडी होती. 'उडारियां' या मालिकेतून ही जोडी लोकप्रिय झाली होती. 'बिग बॉस 16'मध्येही त्यांची केमिस्ट्री पहायला मिळाली. परंतु यावर्षी मार्च महिन्यात दोघांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

3 / 7
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांचे परदेशातील ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाले, तेव्हा या जोडीला चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली होती. त्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं. परंतु या दोघांच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला.

4 / 7
हॉलिवूडमध्येही दुरावा आणि व्यस्त वेळापत्रक या गोष्टींचा सेलिब्रिटींच्या नात्यांवर झालेला परिणाम दिसला. पॉवर कपल म्हणून समोर आलेली टॉम क्रूझ आणि एना डी अरमासची जोडी ऑक्टोबरमध्ये विभक्त झाली.

5 / 7
फहमान खान आणि अदिती शेट्टी हे सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2024 मध्ये या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. परंतु करिअरमुळे त्यांच्या नात्यात फूट पडल्याचं समजतंय. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा ब्रेकअप झाला.

6 / 7
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने आधी त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. नंतर पलाश मुच्छलवर फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात दोघांनी लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं.

7 / 7
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघं फेब्रुवारी महिन्यात अधिकृतरित्या विभक्त झाले. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान या दोघांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांच्या नात्यात फूट पडली.