Chaitra Yatra | जोतिबाच्या नावानं चांगभलं.. दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेची लगबग सुरू

| Updated on: Apr 14, 2022 | 2:46 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 16 एप्रिल असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झालाय.

1 / 5
कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 16 एप्रिल असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झालाय. त्यामुळे डोंगरावर भाविकांची मांदियाळी वाढली असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होत आहेत.

2 / 5
 गुलाल खोबऱ्याची उधळण आणि बा जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर यामुळे ज्योतिबा डोंगर आतापासूनच गुलालात न्हाऊन निघालाय. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

3 / 5
 सुमारे एक हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत संपूर्ण ज्योतिबा डोंगर सीसीटीव्हीच्या छायेखाली आणला आहे.तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था करण्यात आले आहे तसेच आठ ते दहा लाख भाविक जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी येण्याचा अंदाज देवस्थान समिती कडून सांगण्यात येत आहे.

4 / 5
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जागोजागी भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे तसेच पार्किंग व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे

5 / 5
दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा 16 एप्रिल रोजी होणार असून यात्रा काळात सलग सुट्ट्या असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे.