
आचार्य चाणक्य यांना संपूर्ण देश ओळखतो. ते एक अर्थशास्त्री, कुटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास आयुष्यात प्रगती होते आणि जीवन सुखकर होतं, असं म्हटलं जातं.

त्यांनी घराविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास तुमच्या घरात कधीही शांतता नांदणार नाही. घरात अशांतता, नैराश्य, दारिद्र्य राहील असे म्हटले जाते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात देवतांची पूजा केली जात नाही, ज्या घरात मंत्रांचा जप केला जात नाही, त्या घरात आनंद नसतो. असा घरात देवी-देवतांचा वास नसतो. म्हणूनच अशा घरामध्ये दारिद्र्य नांदते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात कोणतेही शुभ कार्य होत नाही, ते घर स्मशानासम असते. त्यामुळेच घरात वेळोवेळी यज्ञ, पूजापाठ, सत्यनारायणाची पूजा करायला हवी. अशा प्रकारच्या क्रियांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते, असे चाणक्य सांगतात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.