
चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आले आहे की, आग डोक्यावर ठेवली तरी ती फक्त जाळण्याचेच काम करेल कारण ही त्याची प्रवृत्ती आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दुष्ट माणसाचा कितीही आदर केला तरी तो तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच देईल.

आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात यश मिळवण्याचा मूळ मंत्र म्हणजेच शिस्त. शिस्तप्रिय व्यक्तीला वेळेचे महत्त्व असते. तसेच एखादे काम वेळेत पूर्ण करण्याची क्षमता विकसित होते. यामुळेच आपली सर्व कामे वेळेमध्येच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

जिथे तुमचा आदर नाही, जिथे तुमची उपजीविका नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे ज्ञानाची चर्चा नाही अशा ठिकाणी क्षणभरही राहू नका. नेहमीच चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा. यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते.

नशिबावर चालणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. असे लोक आळशी आणि निष्काळजी होतात. त्यानंतर त्यांचा वेळ वाया जात नाही. बऱ्याच लोकांना आपण बोलताना ऐकले असेल की, माझ्या नशीबामध्ये जे असेल ते मला मिळेलच...त्यामुळे मी आता प्रयत्न करणे सोडून दिले आहे. मात्र, नशीबावर सोडणाऱ्यांची प्रगती कधीही होत नाही.

सूर्यप्रकाश, वारा वाहणे हे देखील एक सत्य आहे. सत्य सर्वांसाठी समान आहे आणि कधीही बदलत नाही. ज्याला या सत्याचे महत्त्व समजले, त्याचे आयुष्य संपले. बरेच लोक स्वप्नाच्या जगामध्ये जगत असतात. ते वस्तू स्थितीपासून लांब धावतात. मात्र, जे समोर असते तेच सत्य असते.