
वाईट लोकांना टाळायचे असेल तर त्यांच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाका. जेणे करुन ते लोक तुमच्या समोर कधीच डोके वर काढण्याची हिंमत करणार नाहीत.

निर्लज्ज लोकांपासून नेहमी दूर राहावे. ज्याला आपल्या सन्मानाची पर्वा नाही, त्याला तुमच्या सन्मानाची कधीच किंमत कळणार नाही. अशा व्यक्ती तुमचा कधीच आदर करु शकत नाही.

तुम्हाला चारही वेद आणि धर्मशास्त्रांचे ज्ञान असेल, परंतु जर तुम्हाला स्वतःबद्दलचे ज्ञान नसेल तर तुमचे जीवन एका चमच्यासारखे आहे, ज्याने जेवण बनवताना सर्व पदार्थांना स्पर्श केला, परंतु त्यापैकी एकही चाखता आला नाही.

जे लोक चुकीचे काम करतात, किंवा इतरांचा अपमान करतात त्यांच्यापासून दूर राहणे केव्हाही चांगले, अन्यथा तुम्ही त्यांचा बळी कधी व्हाल हे तुम्हाला कळणारही नाही.

कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आपली योजना कोणाशीही शेअर करू नये. अशा वेळी थोडसजरी दुर्लक्ष झाल्यास शत्रू या परिस्थितीचा फायदा घेण्याचा मदत होईल.

तुम्ही कितीही कमकुवत असाल, पण तुमची कमजोरी कधीही दाखवू नका. यामुळे तुमच्या विरोधी माणसाचा त्याचा फायदाच होईल.