Chanakya Niti | मुलांचे संगोपन कसे करायचं ? त्यांच्या भविष्याबाबत संभ्रमात आहात का?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा

| Updated on: Nov 24, 2021 | 7:53 AM

मुलं ओल्या मातीप्रमाणे असतात. आपण त्यांना जसा आकार देऊ ते तसे बनतात. प्रत्येक पालकांना आपल्या मुलाने सर्वोत्तम व्हावे असे वाटत असते. या गोष्टीसाठी आई वडील कोणतीही गोष्ट करायला तयार होतात. एक उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी लहान मुलांचे संगोपन महत्त्वाचे असते. लहानमुलं त्यांचं पहिलं शिक्षण घरातूनच घेतात. त्यामुळे त्यांच्या संगोपनाकडे पालकांनी लक्ष देणं हे त्यांच कर्तव्य आहे. मुलांना योग्य ते शिक्षण मिळण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीती काही गोष्टी सांगितल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 5
लहान मुलांच्या संगोपनाकडे पालकांनी लक्ष देणं महत्तवाचे असते. पहिल्या आठ वर्षात मुलं सद्सद्विवेक बुद्धीने काम करत नाहीत. या काळात ते आपल्या पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे या काळात पालकांनी जास्त सजग राहण्याची गरज असते. घरामध्ये अपशब्द वापरल्यास किंवा वाईट प्रवृत्तीने वागल्यास लहान मुलेसुद्धा नकळतपणे त्या गोष्टी आत्मसात करतात.

2 / 5
 आपण सर्वच लहान मुलांचे लाड करतो पण या गोष्टीमुळे मुलं हट्टी होतात. अशा मुलांना पुढे जावून योग्य आणि चुक यामधला फरक कळत नाही. त्यामुळे मुलांच्या योग्य संगोपनासाठी लहानपणीच त्यांना योग्य गोष्टी समजवल्या पाहीजेत. जेणे करुन त्यांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि मुलांना परिस्थीतीची जाण होईल.

3 / 5
चाणक्याच्या मते , मारहाणीमुळे मुले हट्टी होतात त्यामुळे त्यांना प्रेमाने समजवून सांगितले पाहीजे. पण पाच वर्षानंतर तुम्ही मुलांशी थोडे कठोर वागू शकता. कोणत्याही वयोगटामध्ये मुलांवर हात उचलणे केव्हाही वाईटच असते.

4 / 5
आचार्यांच्या मते भितीमुळे लहानमुलं पालकांशी खोटं बोलतात. अशा परिस्थितीत, पालकांनी मुलाला प्रेमाने समजावून सांगणे महत्त्वाचे ठरते. पण या बाबतीत पालाकांनी जागृक राहण गरजेचे असते. जर भितीपोटी मुलांना खोटं बोलायची सवय लागली तर मुलाच्या भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो.

5 / 5
 लहानपणापासूनच मुलांना  महापुरुषांच्या कथा मुलांनी सांगाव्यात, यागोष्टीमुळे  मुलांना प्रेरणा मिळते आणि चांगल्या विचारांची भरभराट होते. त्याच प्रमाणे त्याचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही योग्य पद्धतीने तयार होतो.