
Chanakya Niti: वेळेचा योग्य उपयोग करणे - चाणक्य म्हणतात वेळ हे सर्वात मोठी धनदौलत आहे.जे वेळीची किंमत जाणतात तेच जीवनात पुढे जातात. वेळेवर काम केल्याने मोठी लक्ष्यही सहज पूर्ण होता. त्यामुळे वेळ वाया घालवणे फार मोठे नुकसान ठरु शकते.

Chanakya Niti: ज्ञान हीच सर्वात मोठी संपत्ती आहे - ज्ञान हे पैशांपेक्षा महत्वाचे आणि मोठे असते. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही प्रत्येक संकटातून पार सहीसलामत पुढे जाऊ शकता. ज्ञानामुळे नवीन संधी मिळतात. योग्य निर्णय घेऊ शकता. म्हणूनच नेहमी नवीन गोष्टी शिकत राहीले पाहीजे.

Chanakya Niti: चांगल्या लोकांची संगत - चाणक्य म्हणतात जशी संगत मिळेल तसेच आपले जीवन बनते. जर तुम्ही समझदार आणि चांगल्या लोकांशी मैत्री केली तर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतीत. त्यामुळे वाईट संगीतीपासून नेहमीच दूर राहीले पाहीजेत.

Chanakya Niti: तुमच्या योजना गुप्त ठेवा - चाणक्य म्हणतात की जर तुमचे लक्ष्य आणि भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगू नका. जर तुमचे खाजगी बाब लोकांना कळली तर शत्रू त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे या रहस्यांना स्वतजवळच ठेवा

Chanakya Niti: संपत्तीचे योग्य नियोजन करा - चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती धनसंचय करते. ती भविष्यात श्रीमंत बनते. कमाई सोबतच बचत आणि गुंतवणूक करायला शिकले पाहीजेत. सढळहस्ते पैसा उडवणे योग्य नाही.

Chanakya Niti: तुमच्या लालसेवर नियंत्रण हवे - जो व्यक्ती स्वत:च्या रागावर , इच्छेवर, लालसेवर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवतो तोच व्यक्ती पुढे मोठा होतो. आत्म नियंत्रण सर्वात मोठी ताकद आहे. संयमाशिवाय मनु्ष्य सफल होऊ शकत नाही.

Chanakya Niti: योग्य वेळी योग्य निर्णय घ्या - जीवनात काही वेळा पटकन निर्णय घेणे गरजेचे असते. चाणक्य म्हणतात की जो व्यक्ती परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतो तो नेहमी यशस्वी होतो. घाबरणे किंवा कचखाऊपणाने चांगल्या संधी हातून जातात. मग पश्चातापाशिवाय काही हाती उरत नाही.