Rajkot Fort : ‘घरातून खेचून एकेकाला….’, राणे-ठाकरे समर्थक राडा, राजकोट किल्ल्यावरचे Photos

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. मालवण सिंधुदुर्गात राजकोट किल्ला आहे. अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला.

| Updated on: Aug 28, 2024 | 1:17 PM
1 / 5
मालवणात ज्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजाी महाराजांचा पुतळा कोसळला, तिथे आता तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे आणि राणे समर्थक आमने-सामने आले आहेत. प्रचंड मोठा राडा होईल असं वातावरण आहे.

2 / 5
निलेश राणे आणि नारायण राणे दोघेही राजकोट किल्ल्यावर उपस्थित आहेत. निलेश  राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते.

3 / 5
कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा आरपारची भाषा केली आहे. काय ते होऊन जाऊं दे एकदाच वैभव नाईक. मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर सगळी जबाबदारी एसपींची असेल असा विनायक राऊत यांनी इशारा दिला.

4 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या विरोधात महाविकास आघाडीने मालवण बंद पुकारलं. त्यानंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी आले. त्यावेळी हा सर्व राडा झाला.

5 / 5
बालिशपणा किती असावा एका माणसामध्ये. म्हणजे 16-17 वर्ष आमच्याविरोधात बोलण्याचा पगार मिळतोय असं आदित्य ठाकरे म्हणाले. एसपी महोदयाना सांगितलय आमच्या नेत्यांचे दौरे पूर्वनियोजित होते. आम्ही दिलेल्या वेळेला इथे आलोय असं विनायक राऊत म्हणाले.