
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी त्यांनी राज्याच्या समोर आपले विचार मांडले

महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू असतानाच, आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून हजर राहून उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी मंत्री मंडळातील माझे सहयोगी मंत्री, तिन्ही सैन्यदलांचे राज्यातील प्रमुख, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव, सर्व प्रमुख पोलीस अधिकारी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.