
उद्या संध्याकाळपासून आपण राज्यात 144 कलम लागू करत आहोत. पुढचे पंधरा दिवसात राज्यात संचारबंदी लागू करत आहोत. अनावश्यक फिरणं टाळावं. घराबाहेर पडू नका.

कोरोना साथीविरोधात एकसाथ लढलं पाहिजे

अनावश्यक येणंजाणं पूर्णपणे बंद राहणार. आवश्यक सेवेतील उद्योग पूर्ण क्षमतेनं चालू राहतील.

बस, लोकल सेवा बंद नाही. अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार.

रोजी थांबली तरी रोटी थांबवणार नाही

पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी.

राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. 12 लाख कामगारांना उपयोग होणार.