
चीनचमध्ये हाहा:कार पाहायला मिळतोय. चीनच्या उत्तर भागात तीव्र भूकंपाच्या धक्का बसला आहे. या भूकंपामुळे चीनमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

चीनच्या गान्सू आणि किंघई या भागात काल रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे हे धक्के होते.

चीनमध्ये आलेल्या या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. घरं उद्ध्वस्त झाली आहेत. इथं युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

चीनमध्ये आलेल्या या भूकंपामुळे 10 किलोमीटच्या परिघात मोठं नुकसान झालंय. युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु आहे. लोकांचे जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करत असल्याचं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

चीनमधील या भूकंपामुळे मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. तर 100 पेक्षा जास्त लोकांचा या त मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.