53 वर्ष जुनं गाणं, आशा भोसलेंच्या आवाजात बनलं कल्ट क्लासिक, थेट पाकिस्तानी पंतप्रधानांनी…

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील एक गाणे आजही संगीतप्रेमींच्या आवडीचे आहे. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ चित्रपटातील या गाण्याशी संबंधित अनेक किस्से चर्चेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं भारतासह जगभरात विशेष आवडीचं बनलं होतं. हे गाणं चक्क पाकिस्तानच्या पंतप्रधान...

| Updated on: Oct 28, 2026 | 6:26 PM
1 / 5
आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी अनेक लोकप्रिय युगलगीते गायली आहेत. त्यापैकी ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे विशेष गाजले. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी अनेक लोकप्रिय युगलगीते गायली आहेत. त्यापैकी ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे विशेष गाजले. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

2 / 5

या गाण्यात झीनत अमान आणि विजय अरोरा दिसतात. त्यांच्या सादरीकरणामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली. 1970 च्या दशकात हे गाणे विशेष लोकप्रिय झाले.

3 / 5

या गाण्याचे बोल मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले आहेत. आर. डी. बर्मन यांनी त्याला संगीत दिले, तर भूपिंदर सिंह यांनी गिटार वाजवली. या संगीतामुळे गाण्याची मोहिनी आजही कायम आहे.

4 / 5

हे गाणे ‘If It's Tuesday, This Must Be Belgium’ या चित्रपटाच्या थीम संगीतापासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. भारताबरोबरच पाकिस्तानमध्येही हे गाणे लोकप्रिय आहे. 2021 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान मध्ये मरियम नवाज यांनी मुलाच्या लग्नात हे गाणे गायले होते.

5 / 5

‘यादों की बारात’ हा 1973 मधील हिंदी चित्रपट आहे. नासिर हुसैन यांनी त्याचे दिग्दर्शन केले, तर सलीम-जावेद यांनी पटकथा लिहिली. धर्मेंद्र, तारिक, नीतू सिंह आणि झीनत अमान यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us