AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif : बाळाच्या जन्मानंतर वजनावरून ट्रोलिंग; कतरिना कैफने सोडलं मौन ! महिलांच्या शरीरावरून टीका करणाऱ्यांना सुनावलं

Katrina Kaif : पोस्टपार्टम वजनामुळे कतरिना कैफला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. अखेर आता तिने यावर मौन सोडलं असून ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Katrina Kaif : बाळाच्या जन्मानंतर वजनावरून ट्रोलिंग; कतरिना कैफने सोडलं मौन ! महिलांच्या शरीरावरून टीका करणाऱ्यांना सुनावलं
| Updated on: Oct 28, 2026 | 6:20 PM
Share

Katrina Kaif : सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवादरम्यान अभिनेत्री कतरिना कैफने पती विकी कौशल अंबानींच्या घरी भेट दिली. गेल्या वर्षी मुलाचा जन्म झाल्यावर, अशा सार्वजनिक इव्हेंटमध्ये कतरिना प्रथमच दिसली होती. मात्र डिलीव्हरीनंतर वाढलेल्या वजनावरून कतरिनाला खूप ट्रोल करण्यात आलं, तिला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला. अनेक यूजर्सनी तिच्या वजनावरच नव्हे तर वाढत्या वयावरही कमेंट्स केल्या होत्या. मात्र कतरिनाचं ट्रोलिंग झाल्यावर बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी तिला सपोर्ट केला आणि टीकाकारांना सुनावलं. इतके दिवस या विषयावर काहीही न बोलणाऱ्या कतरिनाने आता अखेर आपलं मौन सोडलं आहे. तिने ट्रोलर्सना उत्तर देत थेट सुनावलं.

महिलांच्या शरीरावरून केली जाणारी टीका, लोकांच्या अपेक्षांनुसार स्वतःमध्ये बदल करण्याचा दबाव आणि बाळाच्या जन्मानंतर फिटनेसकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन, याबद्दल कतरिनाने ‘व्होग’ला दिलेल्या एका खास मुलाखतीमध्ये स्पष्टपणे तिचं मत मांडलं. आई होणं हा आयुष्यातील असा टप्पा नाही, ज्यातून सावरून पुन्हा पूर्वीसारखे होण्याची गरज आहे, असे कतरिनाचं म्हणणं आहे.

मुलाच्या जन्मानंतर बॉडी शेमिंगबद्दल काय म्हणाली कतरिना ?

बाळाच्या जन्मानंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत बोलताना कतरिनाने सांगितलं की, आजच्या काळात लोकांकडे याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. ती म्हणाली, “ आपण अशा जगात राहतो, जिथे लोकांची बदलती मतं ही आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेच्या शरीरात कोणते बदल होतात, याची माहिती आज बहुतेक लोकांना आहे. मात्र तरीही काही लोकांना एखाद्या महिलेच्या शरीराकडे कठोर नजरेने पाहायचे असेल, तर ती त्यांची निवड आहे. यासाठी माहितीचा अभाव कारणीभूत आहे, असं काही म्हणता येणार नाही. कारण या विषयावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. मला फक्त माझ्या आयुष्यातील या सुंदर टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे आणि पुढे वाटचाल करायची आहे” असं कतरिनाने सांगितलं.

आधीसारखं शरीर व्हायला पाहिजे या दबावाबद्दल अभिनेत्रीचं म्हणणं काय ?

बाळाचा जन्म झाला की महिलांनी शक्य तितक्या लवकर पूर्वीसारखी शरीरयष्टी मिळवावी, या विचारावरही कतरिनाने प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली, “ पूर्वीसारख्या शरीरयष्टीत परत यायचे ? पण कुठे परत जायचं? मी माझ्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलं आहे. ही माझ्या मनापासूनची इच्छा होती, मग मी मागे का जाईन ?” असा सवाल तिने थेट विचारलाय. “ बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसांत विहानचा चेहरा पाहणं आणि मी व विकीने एकत्र घालवलेल्या चार वर्षांच्या प्रवासातून मिळालेला हा सुंदर क्षण अनुभवणं, ही भावना शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे” असंही तिने नमूद केलं.

आपल्या फिटनेसच्या प्रवासाची आणि शरीराला सर्वाधिक ऊर्जा कधी जाणवते, याची मला चांगली समज आहे असं सांगत “ मी माझ्या स्वतःच्या गतीने त्या टप्प्यापर्यंत पोहोचेन,” असंही कतरिना म्हणाली.

Follow Us
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?