
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. आता या मालिकेत अरुंधतीचा मुलगा यश देशमुख आणि आरोही यांचं लग्न दाखवण्यात आलं आहे.

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील आरोही आणि यश यांचं साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नात या दोघांचा पैठणीचा स्पेशल लूक करण्यात आला होता. या लूकची सध्या चर्चा होतेय.

अरुंधती आणि आशुतोष यांनी काही दिवसांआधी आरोही भेटली होती. त्या दोघांनी आरोहीला घरी आणलं होतं. त्यानंतर आरोही आणि यशची भेट झाली. या भेटीनंतर यशला ती आवडू लागली.

काही दिवसांआधी यशने आरोहीला लग्नाची मागणी घातली. आरोहीच्या होकारानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे. साध्या पद्धतीने या दोघांचं लग्न झालं. यश आणि आरोही यांनी लग्नासाठी खास पारंपरिक पेहराव केला होता.

अरुंधतीचा पती आशुतोषचं निधन झालं असल्याचं काही दिवसांआधी या मालिकेत दाखवण्यात आलं. या दु:खातून अरूंधतीला बाहेर काढण्यासाठी कांचनने यश-आरोहीच्या लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे.