
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor-Khan) यांनी नुकतेच मुंबईत त्यांच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगची जय्यत तयारी केली आहे. जिथे आता या जोडीचे फोटो नुकतेच काही वेळापूर्वी समोर आली आहेत.

आमिर खान यावेळी 'लाल सिंह चड्ढा'च्या शैलीत दिसला होता. आमिर खान 'लाल सिंह चड्ढा'च्या लूकमध्ये खूप हँडसम दिसत होता. नुकताच अभिनेता या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी टी-सीरिज कार्यालयात पोहोचला होता.

आमिर खानला पगडीत पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

आमिर खानसोबत करीना कपूर खानसुद्धा शूटिंगसाठी येथे पोहोचली. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आमिरने या सिनेमात शाहरुख खानसाठी एक स्पेशल रोल ठेवण्यात आला आहे. ही कुठला कॅमियो रोल नसून एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे, जी सिनेमासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. शाहरुख व्यतिरिक्त आमिर सलमान खानलाही या सिनेमात घेण्याच्या विचारात आहे.

आमिर खानला त्याच्या या सिनेमात तिन्ही खान एकत्र दाखवण्याची इच्छा आहे, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. सलमान खानसाठीही आमिरने एक महत्त्वाची भूमिका राखून ठेवली आहे.

शाहरुखने त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमातील भूमिकेबाबत सांगितलं आहे, मात्र, अद्याप सलमान खानने या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिलेला नाही.