
आमिर खान याची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी आयरा कायम नुपूर याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची. आता दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...

आयरा आणि नुपूर यांनी 3 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर उदयपूरमध्ये दोघांच्या पारंपरिक पद्धतीत लग्न होणार आहे. पण सध्या सर्वत्र आयरा आणि नुपूर यांच्या वयातील अंतराबद्दल चर्चा रंगली आहे. आयरा हिचा पती नुपूर तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठा आहे.

आयरा 26 वर्षांची आहे, तर नुपूर 38 वर्षांचा आहे. नुपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर, सुश्मिता सेन आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत खुद्द आमिर याने नुपूर माझा जावई नाही तर, माझ्या मुलासारखा आहे... असं म्हणाला होता.

आमिर खान याची लेक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील आयरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आयरा कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही सोशल मीडिया पोस्टमुळे आयरा हिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो...