
अभिनेत्री मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे पती राज कौशल यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.

तिच्या कुटुंबातील सदस्यांसह ती अंत्यसंस्कारासाठी जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंदिरा राजच्या जाण्यानं पूर्णपणे तुटलेली आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये मंदिरा प्रचंड रडताना दिसली.

जेव्हा राजला रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेत होते तेव्हा मंदिरानं स्वत: हातात घेतली.

जेव्हा राजला रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेत होते तेव्हा मंदिरानं स्वत: अर्थी हातात घेतली.

ती पूर्णवेळ डोळे भरुन राजकडे पाहात होती आणि रडत होती. मंदिराचे मित्र आणि अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स तिथे पोहोचले होते.

रोहित रॉय जेव्हा मंदिराला भेटायला गेला तेव्हा ती स्वत:ला सांभाळू शकली नाही. ती त्याला मिठी मारली आणि रडू लागली.

1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं तारा बेदी कौशल असं नामकरण करण्यात आलं होतं.