
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून अभिनेता निलेश साबळे बाहेर पडला. यानंतर निलेश एक नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी निलेश सज्ज झाला आहे.

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा विनोदी कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निलेश साबळे,भाऊ कदम ओंकार भोजने हे विनोदवीरांचं त्रिकूट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्रीही दिसणार आहे.

अभिनेत्री स्नेहल शिदम ही 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात दिसणार आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली स्नेहल आता नव्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण हे देखील या कार्यक्रमात दिसणार आहेत. शिवाय अभिनेते भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल आठल्ये हे देखील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात दिसणार आहेत.

20 एप्रिलपासून 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. निलेश साबळे आणि टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.