राजकिय पक्ष प्रवेशाबाबत अभिनेता अभिषेक बच्चन याने स्पष्टच सांगितलं, म्हणाला…
अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. असं असताना आता अभिषेक बच्चन यानेच याबाबत खुलासा केला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन बॉलिवूड स्टार आहे. पण आता राजकारणात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Source: Abhishek Instagram)

अभिषेक बच्चन यांचा एक फोटो अखिलेश यादव सोबत व्हायरल झाला होता. त्यामुळे समाजवादी पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. (Source: Akhilesh Yadav/Facebook)

आता अभिषेक बच्चन याने याबाबत खुलासा केला आहे. या सर्व अफवा असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. अशा बातम्या कुठून येतात कळत नाही असंही तो पुढे म्हणाला आहे. (Source: Abhishek Instagram)

अभिषेक बच्चन याने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, "मला पॉलिटिक्सचा पी पण माहिती नाही. मी एक अभिनेता आहे आणि त्यात खूश आहे" (Source: Abhishek Instagram)

अभिषेक बच्चनची आई जया बच्चन समाजवादी पार्टीची नेता आहे. 2004 साली खासदार होती. तर अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात नशिब आजमावलं आहे. (Source: Abhishek Instagram)

अभिषेक बच्चन याच्याबाबत 2013 मध्येही अफवा उडाली होती. तेव्हाही अभिषेकने या बातम्यांचं खंडन केलं होतं. (Source: Abhishek Instagram)