
प्रत्येक व्यक्तीसाठी फिटनेस अत्यंत महत्वाचा असतो. निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे. त्यामध्येही बाॅलिवूड आणि टीव्ही अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.

बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटासाठी कलाकार आपले वजन घटवतात आणि वाढवतात. अर्जुन कपूर असो किंवा सारा अली खान यांनी अत्यंत कमी वेळामध्ये आपले वजन कमी केले आहे.

आता या यादीमध्ये अजून एका अभिनेत्याच्या नावाचा समावेश झालाय. एका टीव्ही अभिनेत्याने जबरदस्त असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याला पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेतील फेम गौतम वीरानी याने जबरदस्त असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. गौतम वीरानी याचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

गौतम वीरानी याने तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनयापासून गौतम वीरानी दूर आहे. चाशनी शोमधून गौतम वीरानी याने पाच वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.