
'काहे दिया परदेस' मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेना आणि 'यळकोट यळकोट, जय मल्हार' मालिका फेम अभिनेत्री ईशा केसकर... हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावर ऋषीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीदरम्यान अभिनेता ऋषी सक्सेना याने लग्नाबाबत होणाऱ्या चर्चांवर स्पष्ट भाष्य केलं आहे. त्याने लग्नाबाबतच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत मला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मी लग्न करायला तयार आहे. पण तुम्ही एकदा ईशाला याबाबत विचारा... असं एका मुलाखतीदरम्यान मी सांगितलं. तिथून आमच्या लग्नाबाबतच्या बातम्या समोर आल्या, असं ऋषीने सांगितलं.

लग्न कधी करणार? असं विचारण्यात आलं. तेव्हा लग्न तर करणार आहे. पण इतक्यात नाही. पण लग्न आम्ही करणार आहोत... कधी काय ते ठरवू, असं ऋषीने सांगितलं.

अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री ईशा केसकर हे दोघे मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या. यावर ऋषीने प्रतिक्रिया दिली आहे.