
शीला दिदीचा एक तरी व्हीडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल... शीला दिदी अर्थात 'कामवाली बाई'चे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.'चलेगा दिदी चलेगा' हा तिचा डायलॉग तर प्रचंड व्हायरल झाला.

शीला दिदी अर्थात 'कामवाली बाई' या पात्राने पुण्यातील अपर्णा तांदळेला वेगळी ओळख दिली आहे. तिचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लाखो लोक तिचे व्हीडिओ पाहत असतात.

कामवाली बाई या व्हीडिओची कल्पना कशी सुचली? कामवाली बाईचंच पात्र का साकारावं वाटलं? यावर अपर्णा एका मुलाखतीत बोलती झाली. तिच्या आईबद्दल अपर्णा बोलती झाली.

माझी आईपण कामवाली बाई होती. ती दुसऱ्यांच्या घरी जाऊन कामं करायची. तिला बघून मला वाटलं की आपण यावर कंटेंट तयार केला पाहिजे. कारण याबाबतच्या बऱ्याच कल्पना माझ्या डोक्यात होत्या, असं अपर्णा म्हणाली.

आता आईला मी दुसऱ्याच्या घरी काम करायला जाऊ देत नाही. पण तरी ती म्हणते की मला जाऊ देत काम करायला म्हणून... पण आता मी खूप तिला समजावलं. तेव्हा कुठे आता तिने बाहेर जाऊन काम करणं थांबवलं आहे, असं अपर्णाने सांगितलं.