Operation Sindoor : मग, भारताचं काय चुकलं? पाकिस्तानच्या ल्यारीमधून आला ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करणारा पहिला आवाज
Operation Sindoor : असीम मुनीरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याची त्यांनी निंदा केली. जमीयत उलेमा-ए-इस्लाम-F (JUI-F) चे चीफ मौलाना फजलुर रहमान यांनी इस्लामाबादच्या लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

पाकिस्तानचे सीनियर धार्मिक नेते आणि पॉलिटिशियन मौलाना फजलुर रहमान यांनी काबुल विरोधात इस्लामाबादची लष्करी कारवाई आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुलना केली आहे. “तुमचे शत्रू तिथे आहेत, म्हणून काबूलवरील हल्ला तुम्ही जर योग्य ठरवत असाल, तर भारत पाकिस्तानच्या आत आपल्या शत्रुंना टार्गेट करतो, तेव्हा तुमची Reaction बदलेली का असते?” असा प्रश्न मौलाना फजलुर रहमान यांनी विचारला आहे. अफगाणिस्तानात हल्ले केले. त्यात सर्वसामान्य लोक मारले गेले. असीम मुनीरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याची त्यांनी निंदा केली. जमीयत उलेमा-ए-इस्लाम-F (JUI-F) चे चीफ मौलाना फजलुर रहमान यांनी इस्लामाबादच्या लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“पाकिस्तानच्या सीमेपलीकडील म्हणजे अफगाणिस्तानवरील हल्ल्यांना योग्य ठरवलं जात असेल, तर मग जेव्हा भारत दहशतवाद्यांना संपवण्यासाठी पाकिस्तानच्या आत घुसतो, तर मग त्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही” असं मौलाना फजलुर रहमान स्पष्टपणे म्हणाले.
मग, तुम्ही त्यावर आक्षेप कसा घेऊ शकता?
रहमान कराचीच्या ल्यारीमध्ये ‘मजलिस-ए-इत्तेहाद-ए-उम्मत’ कॉन्फ्रेंसला संबोधित करत होते. “जर तुम्ही म्हणता की, आम्ही अफगाणिस्तानातील शत्रुवर हल्ला केला, त्याला तुम्ही योग्य ठरवता, तर मग भारतही म्हणू शकतो की, त्यांनी बहावलपूर, मुरीदकेमध्ये त्यांच्या देशातील हल्ल्यासाठी जबाबदार ग्रुप्सच्या हेडक्वार्टरवर हल्ला केला. मग, तुम्ही त्यावर आक्षेप कसा घेऊ शकता? तोच आरोप आता पाकिस्तान अफगाणिस्तानवर करत आहे. तुम्ही दोन्ही गोष्टींना योग्य कसं ठरवू शकता?” असं बोचणारे प्रश्न मौलाना फजलुर रहमान यांनी असीम मुनीरला विचारले आहेत.
हे सर्व हल्ले उधळून लावले
7 मे च्या मध्यरात्री भारतीस सैन्य दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिसाइल तसेच ड्रोन हल्ले केले. यात जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टर बहावलपुर आणि मुरीदकेमधील लश्कर-ए-तैयबाचा बेस होता. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलं. लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली होती.
दहशतवादी तळांवर अचूकतेने ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ड्रोन आणि दुसर्या शस्त्रांनी भारतातील अनेक शहरं आणि गावांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच हे सर्व हल्ले उधळून लावले.
