
आपण जेव्हा काम करू लागतो. तेव्हा आपली पहिली कमाई खूप खास असते. या कमाईतून काहीतरी खास करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. कलाकारही त्यांच्या पहिल्या कमाईतून खास वस्तू विकत घेत असतात.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने तिच्या पहिल्या कमाईतून घेतलेल्या वस्तूवर भाष्य केलं आहे. क्रांतीने नुकतंच एक रील शेअर केलं आहे. यात तिने याचा उल्लेख केला आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने तिच्या पहिल्या कमाईतून एक चेन खरेदी केली होती. तसंच आईसाठी पाटल्याही तिने खरेदी केल्या होत्या. नुकंच क्रांतीने इन्स्टाग्रामवर रील शेअर केलं. त्यात तिने हे सांगितलं आहे.

'तू- तू, मी-मी'मध्ये काम करत असताना पर शो मला 200 रूपये मिळायचे ते 200-200 जमवून आईसाठी मी पाटल्या केल्या. मग मी स्वत: साठी व्हाईट गोल्ड चेन आणि व्हाईट गोल्ड पेंडेंट घेतलं होतं, असं क्रांतीने सांगितलं.

प्रेक्षकांना कायमच अभिनय क्षेत्राविषयी कुतुहल असतं. कलाकारांचं काम, त्याचं खासगी आयुष्य याबाबत जाणून घ्यायला लोकांना आवडतं. क्रांती रेडकरचे रील्सही सोशल मीडियावर प्रचंड ट्रेड होत असतात.