
झी मराठीवर एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, या माध्यमातून अभिनेत्री कुंजिका काळविंट आपल्या भेटीला येत आहे.

‘ती परत आलीये’ मालिकेत जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत.

विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. तर, अभिनेता श्रेयस राजे आणि अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

गेले अनेक दिवस या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे आता या मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

त्यातच मालिकेच्या प्रोमोबरोबरच प्रेक्षकांचं लक्ष वेधतेयल ती म्हणजे अभिनेत्री कुंजिका काळविंट ती आता नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नुकतंच कुंजिकानं नवं फोटोशूटही केलं आहे.