
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मोनालिसानं भोजपुरी सिनेमाशिवाय हिंदी टेलिव्हिजनमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत मोनालिसा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

मोनालिसा तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये ओळखली जाते. मोनालिसानं नुकतंच साडी परिधान करून हॉटनेसमध्ये भर घातली आहे.

नुकतंच मोनालिसानं एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये ती निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसली आहे.

साडीमध्येसुद्धा मोनालिसा आपल्या स्टाईलची जादू दाखवताना दिसली. फोटोंमध्ये तिनं अगदी ग्लॅमरस स्टाईलमध्ये साडी कॅरी केली आहे.

फोटोंमध्ये तिनं मॅचिंग बांगड्या आणि बिंदी देखील लावली आहे. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मोनालिसानं 'ब्लॅकमेल' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात मोनालिसानं सुनील शेट्टी आणि अजय देवगन यांच्याबरोबर काम केलं होतं. तरीही मोनालिसाला तिची खास ओळख बिग बॉसमधून मिळाली.