
मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंत सध्या व्यस्त जीवनातून वेळ काढत चिखलदऱ्याला फिरायला गेली आहे. अमरावती जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणी ती धमाल करतेय.

आपल्या नाटयमय आणि नाविन्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखली जाणारी पूजा सावंत ही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.

पूजा या ट्रीपमध्ये प्रचंड धमास करत आहे. सध्या ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करतेय.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक अशी ओळख असणारी अभिनेत्री पूजा सावंत या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. नेहमी आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असलेल्या पूजा सावंतचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पाऊल ठेवलं होतं. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, निळकंठ मास्तर अशा हिट चित्रपटांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.