
अभिनेत्री प्राजक्ता माळी... तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. प्राजक्ता माळी वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट प्राजक्ता शेअर करत असते.

आताही प्राजक्ताने ब्लॅक कलरच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ब्लॅक कलरची साडी आणि त्यावर 'प्राजक्तराज'चे पारंपरिक दागिने घातलेत.

सिली हवा छू गयी... असं म्हणत प्राजक्ताने हे खास फोटो शेअर केलेत. हे आऊटफिट माझं सगळ्यात आवडतं आहे, असं प्राजक्ताने म्हटलं आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिलीय.

प्राजक्ताच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या लूकला दाद दिली आहे. दागिन्यांपेक्षा तरी पण प्राजक्तचं बहरतोय..., असं एका नेटकऱ्याने केली आहे. आता मारता की काय तुम्ही आम्हाला... असंही एका नेटकऱ्यांने म्हटलंय.

ट्रेंड कोणताही असो प्राजक्ता मॅम, तुम्ही आपली संस्कृती थाटात मिरवायची, असं प्राजक्ताच्या चाहत्याने म्हटलं आहे. तर हिऱ्यासारखी चमक असलेली देखणी कलाकार असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.