
सध्या सगळीकडे दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. कलाकारही आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरुने देखील दिवाळीतील खास क्षणाचे फोटो शेअर केलेत.

रिंकूने निळ्या रंगाची साडी दिवाळीला नेसली होती. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं म्हणत रिंकूने खास फोटो शेअर केलेत.

निळ्या रंगाची साडी, त्याला साजेसे दागिने रिंकूने परिधान केलेत. काचेच्या बांगड्या तिने घातल्या आहेत. केसात गजरा माळला आहे. रिंकूचा हा सिंपल पण खास लूक चर्चेत आहे.

नेटकऱ्यांनीही रिंकूच्या फोटोंना पसंती दिली आहे. नेहमी प्रमाणे सुंदरच दिसतीयेस, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. खूपच सुंदर, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय.

साधेपणातील सौंदर्य, असं म्हणत चाहत्याने रिंकूच्या फोटोला दाद दिली आहे. रिंकूच्या या खास फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.