
अभिनेत्री रिंकू राजगुरु.... 'सैराट' सिनेमाच्या नंतर रिंकू राजगुरुला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमानंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. रिंकूबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते.

रिंकूच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला लोकांना आवडतं. एका मुलाखतीदरम्यान रिंकूने तिच्या बाबांसोबतच्या नात्यावर भाष्य केलंय. रिंकू आणि तिच्या बाबांचं नात खूपच खास आहे.

माझे पप्पा आणि मी खूप भांडतो, असं रिंकूने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. माझं आणि माझ्या बाबांचं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भांडण होतं. कधी एखादा मुद्दा मला पटतो. तो त्यांना पटत नाही. कधी त्यांना एखादा मुद्दा पटतो तो मला पटत नाही, असं रिंकू म्हणाली.

पप्पा आणि मी आम्ही सतत भांडत असतो. पण आमचा एकमेकांवर जीव आहे. आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकमेकांशी बोलतो. सतत भांडण होतं म्हणून आमचं नातं स्ट्राँग आहे. त्यांचा मी खूप मार पण खाललाय, असं रिंकूने सांगितलंय.

सैराट, कागर, झुंड, झिम्मा 2, मेकअप, प्रेमाचा रंग आठवा या सिनेमांमध्ये रिंकूने काम केलं आहे. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.