
मराठी मनोरंजनविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून ऋतुजा बागवे हे नाव घराघरांत पोहचल आहे.

‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजा बागवेने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. शिवाय या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत.

साध्या-सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या ऋतुजा बागवेचा हा बोल्ड आणि सुंदर अवतार तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय. हा फोटो सगळ्यांना खूप आवडतो आहे.

या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला आहे. सुंदर फोटोंसोबतच तिचे काही क्लासी व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये ती ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसतेय.