
आदित्य नारायण आणि श्वेता लवकरच आई-वडील होणार आहेत. दोघांनी नुकतीच याची घोषणा केली.

प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर आता आदित्य आणि श्वेताने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.

यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे पोशाख परिधान केले आहेत. दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.

आदित्य आणि श्वेता सध्या त्यांच्या आयुष्यातील या नवीन क्षणाचा आनंद घेत आहेत.

आदित्य आणि श्वेता यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाले होते. प्रदीर्घ नात्यानंतर दोघांनी लग्न केले.