
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुबमन गिल याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांनी इंटरनेटवर सर्च केल्या आहेत. अशात सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्यामध्ये किती वर्षांचं अंतर आहे... यावर देखील अनेक चर्चा रंगल्या.

सारा तेंडुलकर ही शुबमन गिल याच्यापेक्षा मोठी आहे. सारा हिचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 मध्ये झाला होता. सारा आता 26 वर्षांची आहे. तर शुबमन गिल याचा जन्म 8 सप्टेंबर 1999 मध्ये झाला आहे. शुबमन याचं वय 24 वर्ष आहे.

सारा तेंडुलकर ही शुबमन गिल याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी देखील मौन वाळगलं आहे.

शुबमन गिल लोकप्रिय क्रिकेटर आहे, तर दुसरीकडे सारा तेंडुलकर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते